Shri Swami Samarthachi Aarti
Swapnil Bandodkar
Shri Swami Samarthachi Aarti 歌词
जयदेव, जयदेव, जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू, आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी
जगदुध्दारासाठी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी
म्हणूनी शरण आलो, म्हणूनी शरण आलो तुझे चरणासी
जयदेव, जयदेव, जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू, आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, तुझा अवतार
त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार, नलगे त्या पार
तेथे जडमु कैसा, तेथे जडमु कैसा करु मी विस्तार
जयदेव, जयदेव, जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू, आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
देवाधिदेव तू स्वामीराया, तू स्वामीराया
निर्जर मूनिजन ध्याती, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया, आपली ही काया
शरणागता तारी, शरणागता तारी तू स्वामीराया
जयदेव, जयदेव, जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू, आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले, जडमूढ उध्दरीले
किर्ती ऐकुनी कानी, किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले
तुझ्या सूता नलगे, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे
जयदेव, जयदेव, जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू, आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा